Life 

आयुष्य समुद्रासारखय …असं अता प्रकर्षाने जाणवतय….
काय करु गोष्टीच तशा घडत गेल्या…
एकामागे एक…

भरती-ओहोटी….नित्यनियमाच्या …येणारच त्या …थोड्याच चुकणारेत….??? तेही मान्य…

पण ढवळून निघणं सगळ्यात वाईट …. सगळ्या आठवणी कश्या लाटांच्या तडाख्याप्रमाणे अंगावर आल्या… एकाकीच झेलाव्या लागल्या …. काही परतवून लावल्या…काहींनी नखशिखांत भिजवलं….
पण ठरवलच होता मुळी … जहाजाप्रमाणे हेलकावे खायचे …पण परतायचा नाही… नाहीतर त्या पुनः पुनः येतात ….पाठलाग करत … हौसच भारी ना मला ….
….नशीब म्हणालं..भोग अता …. भोगलं निमुटपणे … असहाय्यपणे…

माहितिये अजुन खूप बाकी आहे…पण तोपर्यंत मी स्वतःला घडवीन कणखर ….
आश्च्रर्य याचं वाटतय …………….(काही गोष्टी गुपीत ठेवाव्याच लागतात…हे हल्लीच कळालय मला)……

…. क्रमशः